‘मविआत अडचण निर्माण करू नका’, जागावाटपावरून नाना पटोले यांचा संजय राऊत यांना सल्ला
2019 च्या लोकसभेला जिंकलेल्या जागा आमच्याकडेच राहतील, आमचे 19 खासदार लोकसभेला कायम राहतील', असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना सल्लाही दिला आहे.
मुंबई : 2019 च्या लोकसभेला जिंकलेल्या जागा आमच्याकडेच राहतील, आमचे 19 खासदार लोकसभेला कायम राहतील’, असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना सल्लाही दिला आहे. ‘जागा वाटपाबाबत अजुनही चर्चा नाही.त्यामुळे जागांबाबत कोणीही वक्तव्यं करू नये.भाजपला पराभूत करणे आमचा मुळ उद्देश आहे. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये’, असं नाना पटोले यांनी सांगितलं. तर ‘आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्र बसलो होतो चर्चा आमची झाली आहे.जागा वाटप फॉर्मुला अद्याप ठरला नाही ही वस्तुस्थिती आहे.प्रत्येक जण आग्रही राहणार तसे ते सुद्धा आग्रही आहेत. निवडून कोण येईल हा विषय जागा वाटपात महत्त्वाचा आहे. महाविकास आघाडी एकत्र लढली तर 48 पैकी 40 जागा निवडून येतील’, असं काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.