एकनाथ शिंदे फडणवीसांचा एवढा अपमान करतील वाटलं नव्हतं, काँग्रेस नेत्याची टीका

“एकनाथ शिंदे फडणवीसांचा एवढा अपमान करतील वाटलं नव्हतं”, काँग्रेस नेत्याची टीका

| Updated on: Jun 13, 2023 | 4:27 PM

शिवसेनेच्या जाहिरातीवरुन राज्यातील राजकारणात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. आता या जाहिरातीवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना-भाजपवर बोचरी टीका केली आहे. आमचे मित्र देवेंद्र फडणवीस यांचा इतका अपमान एकनाथ शिंदे हे करतील असं कधीच वाटलं नव्हतं.

मुंबई : शिवसेनेच्या जाहिरातीवरुन राज्यातील राजकारणात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. आता या जाहिरातीवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना-भाजपवर बोचरी टीका केली आहे. “आमचे मित्र देवेंद्र फडणवीस यांचा इतका अपमान एकनाथ शिंदे हे करतील असं कधीच वाटलं नव्हतं. ‘दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है’, अशी परिस्थिती शिंदेंनी करून ठेवली आहे. आमच्या मित्राने आता जपून राहावं. ही जाहिरात खरी की खोटी हे समजून येईल. माझ्या मित्राला देवेंद्र यांना धोका निर्माण झालेला आहे. आमच्या मित्राच्या खुर्चीला आता धोका आहे. आमचे मित्र पुन्हा येईन-पुन्हा येईन असे बोलत होते पण आता दाढीवाले यायला निघाले आहेत”, असं नाना पटोले म्हणाले.

Published on: Jun 13, 2023 04:27 PM