टिळक कुटुंबातील उमेदवार असता तर… नाना पटोले यांनी स्पष्ट केले कारण
कसबा पेठ येथील जागा कॉंग्रेस लढविणार आहे. मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी परंपरा सांगितली. कुटुंबातील कोणी जातो तर आपण ती जागा बिनविरोध निवडून देतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड येथील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच लक्ष घातले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडीच्या नेत्यांना फोन करत आहेत, मलाही त्यांचा फोन आला होता अशी माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. कसबा पेठ येथील जागा कॉंग्रेस लढविणार आहे. मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी परंपरा सांगितली. कुटुंबातील कोणी जातो तर आपण ती जागा बिनविरोध निवडून देतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. पण, भाजपने दुसऱ्याला उमेदवारी दिली आहे. भाजपने येथे टिळक कटुंबातील उमेदवार दिला नाही. टिळक कटुंबातील कुणीच उमेदवार नसल्यामुळे बिनविरोध होण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे परंपरेचा मुद्दाच निकाली निघाला आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले. विरोधी पक्षाच्या आमदारांची कामे थांबवली जात आहेत. सरकार असे कधी कुणासोबत वागले नाही. याकडे मुख्यमंत्री शिंदे यांचे लक्ष वेधल्याचे ते म्हणाले.