‘मुख्यमंत्र्याचं वॉर रूमवर अजित पवार यांचा कब्जा, मुख्यमंत्री गावाला’; काँग्रेस नेत्याची टोलेबाजी
त्यामुळे अनेक मंत्र्यांच्यामध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. यावरून कालच राज्य सरकारने झेंडावंदन बाबात पालकमंत्र्यांची निश्चिती करत यादी जाहीर केली आहे. यावरूनच आता काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट टोलेबाजी केलीय.
मुंबई, 12 ऑगस्ट 2023 |देशाचा स्वातंत्र्य दिन अवघ्या तीन एक दिवसांवर आला आहे. तर राज्य सरकारकडून अजुनही विविध जिह्यांचे पालकमंत्री निवडले गेलेले नाहीत. त्यामुळे अनेक मंत्र्यांच्यामध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. यावरून कालच राज्य सरकारने झेंडावंदन बाबात पालकमंत्र्यांची निश्चिती करत यादी जाहीर केली आहे. यावरूनच आता काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट टोलेबाजी केलीय. त्यांनी 17 जिल्ह्यात पालकमंत्री नाहीत. अशामुळे जिल्हाधिकारी, आयुक्ततांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्री डोळा ठेवून बसले आहेत. अजित पवार यांनी तर मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमवरच कब्जा केला आहे. ते तर गावी गेलेत. हे सरकार जनतेची लूट करत आहे. सत्तेतून लूट करायची एवढेच यांचे ध्येय आहे. हे येडं सरकार असून येडा बनून पेडा खातय अशी टीका देखील त्यांनी केलीय.