Nana Patole | 'जेलमध्ये टाकण्याच्या गोष्टींपेक्षा लोकांचे प्रश्न सोडवा' : नाना पटोले

Nana Patole | ‘जेलमध्ये टाकण्याच्या गोष्टींपेक्षा लोकांचे प्रश्न सोडवा’ : नाना पटोले

| Updated on: Jan 04, 2023 | 8:47 PM

पटोले यांनी शिंदे गटातील नेत्यांना, ह्याला जेलमध्ये टाक त्याला जेलमध्ये टाक करण्यापेक्षा लोकांचे प्रश्न सोडवा असा सल्ला दिला आहे.

मुंबई : राज्यातील राजकीय वाद हा पेटला असतानाच काँग्रसने देखिल यात उडी मारली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील शालेय शिक्षण मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी खासदार राऊत यांना जेल मध्ये टाकू असे म्हटलं आहे. त्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फटकेबाजी करत शिंदे गटावर आणि त्यांच्या मंत्र्यावर निशाना साधला आहे.

शिंदे गटातील केसरकर यांनी राऊत यांना जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्यानंतर ठाकरे गट आणि राऊत यांनी शिंदे गटावर हल्ला चढवला होता. त्यावर आता नाना पटोले यांनी देखिल टीका केली. आणि शिंदे गटातील नेत्यांना मस्ती आल्याचे म्हटलं आहे.

त्याचबरोबर पटोले यांनी शिंदे गटातील नेत्यांना, ह्याला जेलमध्ये टाक त्याला जेलमध्ये टाक करण्यापेक्षा लोकांचे प्रश्न सोडवा असा सल्ला दिला आहे.

Published on: Jan 04, 2023 08:47 PM