आमचे सरकार आल्यावर कोकणचा विकास करू; नाना पटोले
कोकणच्या राजकारणावर बोलताना सांगितले की, कोकणातील माणसांचा काँग्रेसवर विश्वास आहे. त्यामुळे आमची सत्ता आल्यावर कोकणातील विकासाची आम्ही जबाबदारी घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यातील शिवसेना आणि शिंदे गटाच्या राजकारणाचा वाद न्यायालयात असतानाच काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी आमचे सरकार आल्यावर आम्ही कोकणाचा विकास करु असं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस आणि शिंदे गटाचे राजकारण तापणार असल्याचे दिसत आहे. शिवसेना आणि शिंदे गटाचा विषय सध्या न्यायालयात आहे, मात्र न्यायालयाचा निर्णय येण्याआधीच नाना पटोले यांनी आमचे सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी कोकणच्या राजकारणावर बोलताना सांगितले की, कोकणातील माणसांचा काँग्रेसवर विश्वास आहे. त्यामुळे आमची सत्ता आल्यावर कोकणातील विकासाची आम्ही जबाबदारी घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Published on: Sep 12, 2022 09:54 AM
Latest Videos