सत्यजित तांबे यांची उमेदवारी, बाळासाहेब थोरातांची नाराजी अन् पुढची रणनिती; नाना पटोले Exclusive

सत्यजित तांबे यांची उमेदवारी, बाळासाहेब थोरातांची नाराजी अन् पुढची रणनिती; नाना पटोले Exclusive

| Updated on: Feb 07, 2023 | 12:42 PM

बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलाय. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलंय. पाहा...

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षात नाराज आहेत. राज्यस्तरावरील नेत्यांवरील नाराजीचं पत्र त्यांनी पक्षश्रेष्ठींना पाठवलं अन् त्यानंतर आज त्यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलाय. या सगळ्याला सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून झालेल्या राजकारणाचीही झालर आहे. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलंय. बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबाबत मला माहिती नाही. त्यांनी राजीनामा दिलाही असेल तरी तसं कुठलंही अधिकृत पत्र माझ्यापर्यंत आलेलं नाही, असं नाना पटोले म्हणालेत. पक्षाला उभारी देण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत.काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नाही, असंही पटोले म्हणाले आहेत.

Published on: Feb 07, 2023 12:38 PM