नाना पटोले यांचा उद्या वाढदिवस, नागपुरात बॅनरबाजी, पटोले म्हणतात…
पाच जूनला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देणारे बॅनर अनेक ठिकाणी लावले आहेत. या बॅनरवर आमदार नाना पटोले भावी मुख्यमंत्री, शेतकरी पुत्र असा उल्लेख करण्यात आला आहे.यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूर : पाच जूनला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देणारे बॅनर अनेक ठिकाणी लावले आहेत. या बॅनरवर आमदार नाना पटोले भावी मुख्यमंत्री, शेतकरी पुत्र असा उल्लेख करण्यात आला आहे.यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कार्यकर्त्यांचा उत्साह असतो, आमची भूमिका स्पष्ट आहे की, विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. त्यामुळे असे बॅनर लावण्याची गरज नाही आहे, असं मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो. माझा वाढदिवस सामाजिक स्तरावर साजरा केला पाहिजे. गरजूंना मदत करणे, अस़े आवाहन मी कार्यकर्त्यांना करतो”, असे नाना पटोले म्हणाले.
Published on: Jun 04, 2023 10:37 AM
Latest Videos