“मी मुख्यमंत्री व्हावं ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्यास ती पूर्ण होवो”; भद्रा मारुती मंदिरात नाना पटोले यांच्याकडून इच्छा समोर
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.औरंगाबादमधील भद्रा मारुती मंदिरात ही इच्छा बोलून दाखवली आहे. नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
औरंगाबाद, 07 ऑगस्ट, 2023 | भावी मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स राज्यभरात लावले होते. त्यांनंतर चर्चा सुरु झाली ती नाना पटोले यांना मुख्यमंत्री होण्याचे वेध लागल्याची. नाना पटोले यांच्याकडून वेळोवेळी मुख्यमंत्री होण्याची इच्छा पुन्हा समोर आली आहे. आता नाना पटोले यांच्याकडून ही इच्छआ समोर आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. मी सीएम व्हावं ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्यास ती पूर्ण होवो. औरंगाबादमधील भद्रा मारुती मंदिरात ही इच्छा बोलून दाखवली आहे. नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
Published on: Aug 07, 2023 09:09 AM
Latest Videos