शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीचं स्वागत पण...; नव्या राजकीय समीकरणांवर काँग्रेसची प्रतिक्रिया

शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीचं स्वागत पण…; नव्या राजकीय समीकरणांवर काँग्रेसची प्रतिक्रिया

| Updated on: Jan 23, 2023 | 3:29 PM

शिवसेना ठाकरेगट आणि वंचित यांच्या युतीवर नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...

शिवसेना ठाकरेगट आणि वंचित यांच्या युतीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीचे स्वागत करतो. मात्र आमच्याकडे अद्याप कुठलाही प्रस्ताव आला नाही. प्रस्ताव नेमका काय आहे हे पाहून पुढे जाऊ, असं मी उद्धव ठाकरेंना सांगितलं आहे. आमचे याआधीचे अनुभव वाईट आहेत. त्यामुळे ताक सुद्धा आम्ही फुंकुन पितोय. प्रकाश आंबेडकर यांनी नेमका काय प्रस्ताव दिला आहे ते अजून माहिती नाही. विचार करून योग्य वेळी निर्णय घेऊ”, असं नाना पटोले म्हणालेत.

Published on: Jan 23, 2023 03:29 PM