मविआ सरकारला निर्णय लकवा होता, फडणवीसांच्या टीकेवर नाना पटोले म्हणाले...

“मविआ सरकारला निर्णय लकवा होता”, फडणवीसांच्या टीकेवर नाना पटोले म्हणाले…

| Updated on: Jun 01, 2023 | 12:27 PM

बुधवारी अहमदनगरमध्ये निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ पार पडला. मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निब्रळ येथे जलपूजन करण्यात आले.यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून अनेक घोषणा केल्याच पण महाविकास आघाडीवर टीका ही केली.

नागपूर : बुधवारी अहमदनगरमध्ये निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ पार पडला. मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निब्रळ येथे जलपूजन करण्यात आले.यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून अनेक घोषणा केल्याच पण महाविकास आघाडीवर टीका ही केली. “मविआ सरकारला निर्णय लकवा होता”, असे फडणवीस म्हणाले. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कोरोनाच्या काळात पंतप्रधान मोदी यांनीच आचारसंहिता लावल्या होत्या, असं नाना पटोले म्हणाले. तसेच लकवा मारण्याची भाषा करण्यापूर्वी फडणवीस यांनी अभ्यास करावा”, असं पटोले यांनी म्हटलं आहे.

Published on: Jun 01, 2023 12:26 PM