‘राहुल गांधी यांना मिळालेल्या खासदारकीचं देशाला आनंद’; काँग्रेस नेत्याचं विधान

‘राहुल गांधी यांना मिळालेल्या खासदारकीचं देशाला आनंद’; काँग्रेस नेत्याचं विधान

| Updated on: Aug 07, 2023 | 3:14 PM

त्यांना बदनामीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण आता सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती दिल्याने त्यांचा खासदारकीचा मार्ग खुला झाला. तसेच त्यांना पुन्हा एकदा खासदारकी बहाल करण्यात आली आहे.

मुंबई, , 7 ऑगस्ट 2023 | सर्वोच्च न्यायालयाने गुजरात न्यायालयाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यांना बदनामीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण आता सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती दिल्याने त्यांचा खासदारकीचा मार्ग खुला झाला. तसेच त्यांना पुन्हा एकदा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. यामुळे देशभरात असणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच आनंदोत्सव साजरा केला. याचदरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यांवरून प्रतिक्रिया देताना, राहुल गांधी यांनी पुन्हा खासदारकी मिळाल्याने देशातील जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तर यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुध्ये उत्साह तर आहेच. कारण त्यांनी एका अन्यायी आणि तानाशाहाविरोधात त्यांनी लढाई लढली. त्यामुळे त्याची प्रेरणा कार्यकर्त्यांमध्ये आलीच आहे. सोबतच ही प्रेरणा जनतेच्या मनात ही आली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासारख्या नेतृत्त्वाला जनतेने डोक्यावर घेतलय असं पटोले म्हणालेत.

Published on: Aug 07, 2023 03:14 PM