“सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राला लावलेला कलंक आम्ही पुसू”, काँग्रेस नेत्याचा घणाघात
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. हे अधिवेशन राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. दरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी "आज विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचं नाव जाहीर केलं जाईल," असं सांगितलं आहे.
मुंबई, 17 जुलै 2023 | राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. हे अधिवेशन राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. दरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी “आज विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचं नाव जाहीर केलं जाईल,” असं सांगितलं आहे. “तसेच भाजपकडे अनुभवी नेते नसल्यामुळे भाजपने दुसऱ्यांचे आमदार चोरले आहेत. भाजप हा शेतकरी विरोधी पक्ष आहे हे जनतेला कळलं आहे. आज अधिवेशनात सरकारविरोधी भूमिका घेऊ. अधिवेशनात शेतकरी आणि सामान्यांचे प्रश्न मांडणार आणि सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राला लावलेला कलंक आम्ही पुसू,” असं नाना पटोले म्हणाले.
Published on: Jul 17, 2023 11:26 AM
Latest Videos