Nanded : चाकूचा धाक दाकून लुबाडणाऱ्या दोघींना नांदेडमधून अटक! 1.50 लाखाचा मुद्देमालही जप्त

Nanded : चाकूचा धाक दाकून लुबाडणाऱ्या दोघींना नांदेडमधून अटक! 1.50 लाखाचा मुद्देमालही जप्त

| Updated on: Jun 04, 2022 | 9:23 AM

Nanded Crime : नवा मोंढा परिसरात घडलेल्या अशाच गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना या दोन महिलांना बेड्या ठोकल्यात.

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded Crime) चाकूचा धाक दाखवून लोकांना लुबाडणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक (Nanded Police News) केली. या आरोपी महिलांकडून दीड लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निर्जनस्थळी सावज हेरून या लुटारु महिला चाकूचा धाक दाखवायच्या आणि धमकावून लोकांची लूट करत होत्या. नवा मोंढा परिसरात घडलेल्या अशाच गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना या दोन महिलांना बेड्या ठोकल्यात. या महिलांचा एक पुरुष साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेतायत. दरम्यान, या लुटारू महिलांना न्यायालयात हजर केले असता त्यांनी पोलिसांवरच खोटेनाटे आरोप केलेत. या महिलांची सध्या नांदेड पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय.