Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: वादळी वाऱ्याचं थैमान, पत्रा उडाला, तरुण बालंबाल बचावला, नांदेडमधील वादळानं थरकाप

Video: वादळी वाऱ्याचं थैमान, पत्रा उडाला, तरुण बालंबाल बचावला, नांदेडमधील वादळानं थरकाप

| Updated on: May 11, 2022 | 9:01 AM

Nanded Heavy Winds : आज उद्या मराठवाडा आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असानी वादळामुळे वातावरणात बदल झाल्याचं पाहायला मिळलंय.

नांदेड : नांदेडच्या (Nanded News) नायगावमध्ये वादळी वाऱ्यानं (Nanded Heavy Storms) थैमान घातलंय. यावेळी वादळी वाऱ्यामुळे एक पत्रा उखडला गेला. हा पत्रा एका तरुणाच्या अंगावर पडणार होता. पण हा तरुण थोडक्यात बचावलाय. अनेक घरांचे पत्र या वादळात उडाले आहेत. त्यामुळे अनेक घरांचं नुकसान झालंय. दोन तरुण बाईकवर बसत होते. इतक्या वाऱ्याच्या वेगानं एक पत्रा हवेत उडत त्यांच्या दिशेनं आला. मात्र वेळीच जागेवरुन हटल्यानं मोठा अनर्थ टळलाय. या वादळीमुळे शेतातील पिकांचं आणि फळांचही नुकसान झालंय. काहीजण वादळी वाऱ्यानं किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, आज उद्या मराठवाडा आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असानी वादळामुळे वातावरणात बदल झाल्याचं पाहायला मिळलंय. तर नांदेडमधील नायगावमध्ये आंब्यांचं वादळी वाऱ्यानं नुकसान झालंय.

Published on: May 11, 2022 08:58 AM