हिरव्यागर्द वनराईनं नटलेल्या रामगड किल्ल्याचे बघा नयनरम्य ड्रोन दृश्य
VIDEO | नऊ किलोमीटर अंतराच्या प्रदीर्घ परिसरात या नांदेड जिल्ह्यातील रामगड किल्ल्याचा विस्तार असून समुद्र सपाटीपासून 2600 फूट उंचीवर असलेला हा किल्ला पर्यटकांना आकर्षित करतोय, डोंगरी किल्ला, गिरीदुर्ग आणि गौंड राजाचा किल्ला म्हणून देखील या किल्ल्याची ओळख
नांदेड, १२ ऑगस्ट २०२३ | पावसाळा सुरू झाला की, निसर्गप्रेमी आणि पर्यटकप्रेमींना वेध लागतात ते वर्षा सहलीचे… अशातच पावसाळा सुरू झाला की, अनेक निसर्गरम्य ठिकाणं, नद्या, धबधबे आणि गड किल्ले या ठिकाणी पर्यटकांचे पाऊल अपसुकच वळतात. नांदेड जिल्ह्यात असलेल्या रामगड किल्ल्याकडे पर्यटक आकार्षित होतांना दिसताय. नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहुरच्या वनराईने हिरवा शालू नेसलाय, त्यामुळे चौदाव्या शतकातील इथल्या किल्ल्याचा परिसर नयनरम्य असा झाला आहे. जवळपास नऊ किलोमीटर अंतराच्या प्रदीर्घ परिसरात या किल्ल्याचा विस्तार असून समुद्र सपाटीपासून 2600 फूट उंचीवर असलेला हा किल्ला पर्यटकांना आकर्षित करतोय. डोंगरी किल्ला, गिरीदुर्ग आणि गौंड राजाचा किल्ला म्हणून देखील या किल्ल्याची ओळख आहे. हिरव्यागर्द वनराईने नटलेल्या या किल्ल्याचे ड्रोन व्हिडिओ तुम्ही पाहिलेत का?