ट्रक-टेम्पोचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू, पाहा घटना कुठे घडली?
राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झालाय. पाच जणांचा या अपघातात मृत्यू झालाय.
राजीव गिरी, Tv9 मराठी, प्रतिनिधी, नांदेड : नांदेडमध्ये (Nanded Accident) ट्रक आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक झाली. यात पाच जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झालेत. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर-किनवट या राष्ट्रीय महामार्गावर करंजी फाट्याजवळ रात्री हा अपघात झाला. ट्रक भोकरकडून चंद्रपूरकडे जात होता. तर हिमायतनगरकडून जळगावकडे आयशर टेम्पो (Truck and Eicher Tempo Accident) जात होता. टेम्पोत रेल्वे ट्रॅकवर लाईटचं काम करणारे मजूर होते. समोरासमोर झालेल्या या धडकेत दोन्ही वाहनातील चालक दगावलेत. शिवाय अन्य 3 जणांचाही मृत्यू झालाय. एकूण पाच जणांमा आपला जीव गमवावा लागलाय. तर आणखी 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Published on: Sep 25, 2022 09:27 AM
Latest Videos