नंदूरबारमध्ये भाजप रस्त्यावर; सावरकर गौरव यात्रेतून राहुल गांधींना इशारा
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी बलिदान दिलं आहे मात्र काँग्रेस कडन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल चुकीचे शब्द वापरले जात आहेत. ते आम्ही कधीही सहन करणार नाही
नंदूरबार : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात काँग्रेसचे अनेक नेते वादग्रस्त आणि चुकीचे वक्तव्य करत आहेत. तर राहुल गांधी यांनी वेळोवेळी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यावर राज्यात भाजप आणि शिंदे गटाकडून सावरकर गौरव यात्रेतून राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना निशाना करण्यात येत आहे. नंदूरबारमध्ये ही राहुल गांधीविरोधात तर सावरकर यांच्या समर्थनार्थ सावरकर गौरव यात्रा नंदुरबार शहरात काढण्यात आली. नंदुरबार शहरातील मोठा मारुती पासून छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, अंधारे चौक, जुनी नगरपालिका, शास्त्री मार्केट, शिरीष कुमार मेहता स्मारकापर्यंत या यात्रेच्या आयोजन करण्यात आलं होतं.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी बलिदान दिलं आहे मात्र काँग्रेस कडन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल चुकीचे शब्द वापरले जात आहेत. ते आम्ही कधीही सहन करणार नाही. त्यामुळे काँग्रेसचे नेत्यांनी माफी मागितली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातील असंख्य लोकांची आहे. या गौरव यात्रा राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुप्रियाताई गावित, सांसद रत्न खासदार डॉ. हिनाताई गावित, भाजपाचे महामंत्री तथा जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी आणि मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.