उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर नारायण राणे यांची टोलेबाजी; म्हणाले, “टिनपाटाच्या डब्याचा चिरका ताशा…”
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रखर मुलाखत काल आणि आज प्रसारित झाली. ही मुलाखत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतली. या मुलाखतीनंतर केंद्रीय मंत्री नाराय राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
मुंबई, 27 जुलै 2023 | ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रखर मुलाखत काल आणि आज प्रसारित झाली. ही मुलाखत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. या मुलाखतीनंतर शिवसेना आणि भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नाराय राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. नारायण राणे यांनी प्रहारमधून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज्यात टिनपाटाच्या डब्याचा चिरका ताशा तडतडतोय, ज्याने स्वत:च्या भावाला बरोबर न ठेववलं नाही तो महाराष्ट्राला काय सांभाळणार, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
Published on: Jul 27, 2023 12:14 PM
Latest Videos