संजय राऊत नीच माणूस;बनावट पत्रकार

संजय राऊत नीच माणूस;बनावट पत्रकार

| Updated on: Jul 26, 2022 | 8:35 PM

शिवसेना फुटण्यास खासदार संजय राऊत जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यानी संजय राऊतांवर टीका करताना संजय राऊत हा नीच माणूस असल्याची जहरी टीकाही त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री पद गेल्यानंतर आता मुलाखती आणि शिवसेनेच्या शाखेत जाण्याची बुद्धी उद्धव ठाकरेंना सुचली आहे. या आधा गेल्या अडीच वर्षात तुम्ही कधी कुणाला भेटला आहात का, विचारपूस केली आहे का असा खडा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका करत खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद संजय राऊत यांनी घालवलं आहे, त्यामुळे आता त्यांना मुलाखत घेण्याची वेळ येत आहे. संजय राऊत हे पत्रकार नाहीत, ते जोकर आहेत. कुणाच्याही तालावर नाचतात, तर आता मात्र संजय राऊत आपल्या तालावर उद्धव ठाकरे यांना नाचवत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. शिवसेना फुटण्यास खासदार संजय राऊत जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यानी संजय राऊतांवर टीका करताना संजय राऊत हा नीच माणूस असल्याची जहरी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Published on: Jul 26, 2022 08:35 PM