‘या’ व्यक्तीचं नाव नका घेऊ, दिवस खराब जाईल, उपवास करावा लागेल- नारायण राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. पाहा...
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काहीवेळा आधी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी शिवसेना ठाकरेगट आणि आदित्य ठाकरेंवर टीका केलीय. आदित्य ठाकरेचं नाव नका घेऊ हो… माझा दिवस खराब जाईल. मला उपवास करावा लागेल,असं म्हणत नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केलीय. ठाकरेगट आपल्या वडिलांना विसरला आहे. उद्धव ठाकरे ज्या चिन्हासाठी भांडतोय ते त्याला मिळणार नाही. एकनाथ शिंदे यांनाच धनुष्यबान मिळणार आहे, असंही राणे म्हणालेत.
Published on: Feb 11, 2023 03:16 PM
Latest Videos