नारायण राणे म्हणाले, त्याचे नाव घेतलं तर मला जेवणही जात नाही

नारायण राणे म्हणाले, त्याचे नाव घेतलं तर मला जेवणही जात नाही

| Updated on: Oct 05, 2023 | 8:12 PM

केंद्रीय मंत्री नारायणे राणे यांनी ठाकरे गटाच्या होऊ दे चर्चा या कार्यक्रमावर चांगलीच टीका केलीय. उद्धव याने अडीच वर्षात काय केलं हे आधी सांगावं. खोके आणि ठोके या पलीकडे उद्धव ठाकरे जात नाही असे ते म्हणालेत.

सिंधुदुर्ग : 5 ऑक्टोबर 2023 | उद्धव ठाकरेच नाव घेतल्यानंतर जेवण जात नाही, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावलाय. मोदी सरकार विरोधात उबाटाच्या वतीने होउ दे चर्चा हा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेतला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. अडीच वर्षात त्याने काय केले ते सांगावे. उद्धव ठाकरेनी अडीच वर्षात काय पराक्रम केले ते सांगावे. जीडीपी किती वाढविला? किती जणांना नोकऱ्या दिल्या. बेरोजगारी किती कमी केली. गरीबीचे प्रमाण किती कमी केले? कुपोषणाचे प्रमाण किती कमी केले हे सांगावे. हे विषय त्याला कळणार पण नाही. खोके आणि ठोके या पलीकडे उद्धव ठाकरे जात नाही, अशी टीका राणे यांनी यावेळी केली. उद्धव ठाकरेच नाव घेतल्यानंतर जेवण जात नाही, असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला.

Published on: Oct 05, 2023 08:11 PM