नारायण राणे एकनाथ शिंदेंच्या भेटीला; ‘या’ महत्त्वाच्या विषयावर होणार चर्चा
केंद्रीय मंत्री नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी 'वर्षावर' दाखल झाले आहेत. ते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षावर’ दाखल झाले आहेत. राणे, शिंदेंमध्ये काय चर्चा होणार याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र सध्या वेदांता प्रकल्प (Vendata Project) गुजरातला हलवण्यात आल्यानं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे, याच सर्व पार्श्वभूमीवर या भेटीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटील महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Published on: Sep 15, 2022 12:19 PM
Latest Videos