पालकमंत्री जिल्ह्याचाच असावा, तरच जिल्ह्याचा विकास होऊ शकतो, नरेंद्र भोंडेकर यांचं सूचक विधान

“पालकमंत्री जिल्ह्याचाच असावा, तरच जिल्ह्याचा विकास होऊ शकतो”, नरेंद्र भोंडेकर यांचं सूचक विधान

| Updated on: Jun 07, 2023 | 11:38 AM

मला जर मंत्रिपदाची संधी मिळणार नसेल तर भाजप किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मंत्रिपद द्या. मात्र, बाहेरचा पालकमंत्री दिल्यास त्याला १०० टक्के विरोध असेल", असा इशारा भंडाऱ्यातील शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिंदे – फडणवीस सरकारला दिला आहे. यावर आता नरेंद्र भोंडकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

नागपूर : “मला जर मंत्रिपदाची संधी मिळणार नसेल तर भाजप किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मंत्रिपद द्या. मात्र, बाहेरचा पालकमंत्री दिल्यास त्याला १०० टक्के विरोध असेल”, असा इशारा भंडाऱ्यातील शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिंदे – फडणवीस सरकारला दिला आहे. यावर आता नरेंद्र भोंडकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “नक्कीच मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी अपेक्षा आहे आणि आम्हालाही न्याय मिळेल असे अपेक्षित आहे”, असं नरेंद्र भोंडेकर म्हणाले. “मंत्रीपदाची इच्छा सर्वच आमदार करत आहेत, मात्र आमच्यात एकोपा आहे. त्यामुळे आमच्यात कोणालाही संधी दिली आणि सरकारच्या सोबत आहोत”, असं भोंडेकर म्हणाले. “तसेच जिल्ह्याचा विकास साधायचा असेल तर स्थानिक पालकमंत्री असायला हवा, भंडाऱ्याचा विचार करत न्याय द्यायला हवा”, असं नरेंद्र भोंडेकर म्हणाले.

Published on: Jun 07, 2023 11:38 AM