पहाटेचा शपथविधी हे बंड होतं की शरद पवारांविरोधातील उठाव? अजितदादा स्पष्ट करा; कुणी दिलं आव्हान?
शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवार यांना आव्हान दिलं आहे. तसंच संजय राऊतांवरही टीका केली आहे. पाहा...
शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवार यांना आव्हान दिलं आहे. पहाटेचा शपथविधी हे बंड होतं? गद्दारी होती की शरद पवारांच्या विरोधात उठाव होता, ते आधी अजितदादांनी स्पष्ट करावं, असं नरेश म्हस्के म्हणालेत. त्या शपथविधीवेळी राष्ट्रवादीच्या लोकांनी अजित पवारांचे पुतळे जाळले होते. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी परिस्थिती अजित पवारांची झाली आहे, असं घणाघातही त्यांनी केला आहे. संजय राऊत जेलमधून आल्यानंतर त्यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. ते सकाळी सकाळी भुंकायला येतात. जर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री कुणी मानत नाही, असं यांचं मत आहे तर मग राऊतांना लोक मानतात का?, असा सवाल म्हस्के यांनी विचारला आहे.
Published on: Feb 14, 2023 02:05 PM
Latest Videos