राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच गद्दारीतून झाला, कोणी केली टीका?

“राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच गद्दारीतून झाला”, कोणी केली टीका?

| Updated on: Jun 22, 2023 | 11:43 AM

20 जून रोजी महाराष्ट्रात ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गद्दार दिन आणि खोके दिवस साजरा करण्यात आला. याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेच्या वतीने स्वाभिमान दिवस साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.

ठाणे : 20 जून रोजी महाराष्ट्रात ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गद्दार दिन आणि खोके दिवस साजरा करण्यात आला. याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेच्या वतीने स्वाभिमान दिवस साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. “महाराष्ट्रात 20 जून हा दिवस हास्यास्पद दिवस होता. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यादिवशी गद्दार दिन आणि खोके दिवस साजरा करत आंदोलन केलं. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मचं गद्दारीतून झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले गुरू वसंतदादा पाटलांशी केलेली गद्दारी असेल किंवा काँग्रेसमधून फुटून केलेली राष्ट्रवादी पक्षाची स्थापना याला गद्दारी नाहीतर काय म्हणतात ? काही चंटर पंटर लोकांना गोळा करून हे आंदोलन केलं. त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, आम्ही नव्हे तर गद्दारी तुम्ही केली आहे तुमचा जन्मच गद्दारीतून झाला आहे,” असा हल्लाबोल नरेश म्हस्के यांनी केला आहे.

Published on: Jun 22, 2023 11:43 AM