राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना नामधारी मुख्यमंत्री बनवले, शिवसेनेच्या नेत्याची टीका

“राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना नामधारी मुख्यमंत्री बनवले”, शिवसेनेच्या नेत्याची टीका

| Updated on: Jun 22, 2023 | 1:21 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुण्यामध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघात 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वत: या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. याच पार्श्वभूमीवर नरेश म्हस्के यांनी सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुण्यामध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वत: या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. याच पार्श्वभूमीवर नरेश म्हस्के यांनी सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. “एखाद्याला आपण नाव ठेवायचं आणि नंतर त्याच उपक्रमाची कॉपी करायची, हे खडकवासला मतदारसंघात दिसून आलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज या योजनेतून राज्यातला कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत आहेत. त्यांच्या या कामाचा झपाटा पाहून आम्ही समजू शकतो तुमच्या नाकाला मिरच्या झोंबल्या ते. राष्ट्रवादी दुसऱ्याच्या तव्यावर आपली पोळी नेहमीसारखी भाजून घेते, उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि त्यांना नामधारी मुख्यमंत्री बनवले आणि संपूर्ण शासन वापरून घेतलं. कधीतरी दिलदारपणा करा. कार्यक्रमाचे अनुकरण करत आहात ही गोष्ट चांगली आहे, मात्र त्यावर टीका करू नका, चांगल्या गोष्टींचे कौतुक करायला शिका,” अशी टीका नरेश म्हस्के यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली.

Published on: Jun 22, 2023 01:21 PM