“आनंद दिघेंना शरद पवारांनीच जेलमध्ये टाकलं होतं का ?”, नरेश म्हस्के यांचा जितेंद्र आव्हाड यांना सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी धर्मवीर आनंद दिघे यांनी जामिनासाठी पवारांनी मदत केली, असं म्हटलं आहे. पवारांनी ठरवलं असतं तर आनंद दिघे टाडाच्या बाहेर आले नसते, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. यावर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे.
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी धर्मवीर आनंद दिघे यांनी जामिनासाठी पवारांनी मदत केली, असं म्हटलं आहे. पवारांनी ठरवलं असतं तर आनंद दिघे टाडाच्या बाहेर आले नसते, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. यावर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. “जितेंद्र आव्हाड धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या बद्दल जे वक्तव्य केलं आहे ते जरा भान ठेवून करा. ते आनंद दिघे बोलले त्यांना धर्मवीर बोलायला लाज वाटते का? शरद पवारांमुळे जमीन मिळाला असं म्हणता तर शरद पवार काय तेव्हा न्यायाधीश होते का ? न्यायालय शरद पवार साहेब चालवत होते का ? शरद पवार साहेबांनीच आनंद दिघे यांना जेलमध्ये टाकलं होतं का? याचं स्पष्टीकरण आव्हाडांनी द्यावं”, असं नरेश म्हस्के म्हणाले.