डोक्यावर परिणाम तर शॉक लागल्याने ते सैरभैर; संजय राऊत यांच्यावर नरेश म्हस्केंची टीका

डोक्यावर परिणाम तर शॉक लागल्याने ते सैरभैर; संजय राऊत यांच्यावर नरेश म्हस्केंची टीका

| Updated on: Jan 07, 2023 | 7:44 AM

राऊत यांचे सध्याचे विधाने आणि टीका पाहील्या असत्या त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. ते सैरभैर झाले आहेत. त्यांना शॉक लागला आहे, अशी टीका ठाण्याचे माजी महापौर आणि शिंदे गटाचे ठाण्याचे प्रवक्त नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे.

ठाणे : शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाळीनंतर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट एकमेकांसमोर उभे ठाकले असून दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडताना दिसतात. आताही ठाण्याचे माजी महापौर आणि शिंदे गटाचे ठाण्याचे प्रवक्त नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे म्हटलं आहे.

राऊत यांचे सध्याचे विधाने आणि टीका पाहील्या असत्या त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. ते सैरभैर झाले आहेत. त्यांना शॉक लागला आहे.

कित्येक दिवस झाले मी हेच सांगतोय की राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. राऊतांना मानसिक त्रास होतोय. त्यांना उपचाराची गरज आहे. हेच आज समोर आलं आहे. ज्या नाशिकच्या जीवावर ते राजकारण करू पाहत होते. तेथेच त्यांना धक्यावक धक्के बसत आहेत.

Published on: Jan 07, 2023 07:44 AM