“शासनाने आदिवासी दिनानिमित्त सुट्टी जाहीर करावी”; नरहरी झिरवाळ यांची मागणी
आज विधानभवन परिसरात आदिवासी दिन साजरा करण्यात आला आहे. यावेळी आदिवासी वेशभूषा करत नरहरी झिरवाळ सहभागी झाले. वाद्यांच्या तालावर नरहरी झिरवाळ थिरकले. नरहरी झिरवाळ यांनी शासनाने आदिवासी दिनानिमित्त सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केली
मुंबई, 09 ऑगस्ट 2023 | आज विधानभवन परिसरात आदिवासी दिन साजरा करण्यात आला आहे. लोकगीते गात, नृत्य करत आदिवासी बांधवांचा जल्लोष यावेळी पाहयाला मिळाला. यावेळी आदिवासी वेशभूषा करत नरहरी झिरवाळ सहभागी झाले. वाद्यांच्या तालावर नरहरी झिरवाळ थिरकले. नरहरी झिरवाळ यांनी शासनाने आदिवासी दिनानिमित्त सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केली. ते म्हणाले की, “आज राज्यभरात क्रांती दिन म्हणून साजरा केला जात आहे. सकाळपासनं आपण बघितलंय. राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी हुतात्मा मैदानावर त्याठिकाणी सुंदर असा कार्यक्रम साजरा केला. मी चौथं वर्ष आहे. आदिवासी क्रांती दिन म्हणून साजरा या विधान मंडळात करत असतो. मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन मग ते अध्यक्ष असतील. सभापती असतील, त्यावेळेला रामराजे नाईक निंबाळकर साहेब होते. मला कुठेही अडचण त्याठिकाणी आणली नाही. माझं म्हणणं शासनाला विनंती आहे. का आदिवासी दिनाची सुट्टी जाहीर करावी. आदिवासी दिन हा शासकीय साजरा व्हावा. का जसं आज प्रत्येक खेड्यापाड्यांमध्ये आदिवासी क्रांती दिन साजरा होतो. मग कार्यक्रम हे इथून पुढंही करतच राहू, चालूच राहतील. त्यात कुठं खंड होणार नाही.”

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले

'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
