शेतकऱ्यांची थट्टा कशासाठी? मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार; अजित पवार आक्रमक
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाफेड कांदा खरेदीवर प्रतिक्रिया दिली आहे. नुकसान भरपाईही सरकारने दिली पाहिजे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे. पाहा व्हीडिओ...
नाशिक : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाफेड कांदा खरेदीवर प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही अधिवेशनात हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली. सरकारने तीनशे रुपये जाहीर केले. आम्ही पुन्हा अनुदान वाढवण्याची मागणी केली त्यानंतर साडे तीनशे रुपये अनुदान देण्यात आलं. आम्ही सरकारला सांगितले की, ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. आम्ही वेगवेगळे खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली. अधिवेशन 25 तारखेला संपलं. बऱ्याच ठिकाणाहून ऐकू येत आहे की, खरेदीकेंद्र बंद आहेत. मी स्वत: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधणार आहे, अजित पवार म्हणाले. नुकसान भरपाईही सरकारने दिली पाहिजे. मध्यंतरी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. काही शेतकऱ्यांना मदत पोहचली नाही. हरभरा केंद्र देखील आणखी सुरू करावे, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
Published on: Mar 30, 2023 12:07 PM
Latest Videos