बाळासाहेबांची प्रतिकृती 32 X 26 फुटाच्या पोस्टरवर साकारली, जयंतीनिमित्त अनोखं अभिवादन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती आहे. नाशिकमध्ये शिवसेवा युवक मित्र मंडळाकडून बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी करण्यात येत आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. नाशिकमध्ये शिवसेवा युवक मित्र मंडळाकडून बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माजी महापौर विनायक पांडे यांचा अनोखा उपक्रम राबवला आहे. 32 बाय 26 फुटाची बाळासाहेबांची प्रतिकृती पोस्टरवर साकारली आहे. तसंच अकरा हजार एकशे अकरा लाडूंचे वाटप करण्यात येणार आहे. मशाल चिन्ह असलेले अकराशे अकरा फुगे आकाशात सोडण्यात येणार आहेत.
Published on: Jan 23, 2023 11:26 AM
Latest Videos