Nashik China Made Rakhi Banned | इगतपुरीतील बाजारपेठा राख्यांच्या स्टॉलनं सजल्या, चायना मेड हद्दपार

Nashik China Made Rakhi Banned | इगतपुरीतील बाजारपेठा राख्यांच्या स्टॉलनं सजल्या, चायना मेड हद्दपार

| Updated on: Aug 08, 2022 | 9:41 AM

यंदाच्या राखी मध्ये 25 ते 30 टक्क्यापर्यंत मोठी दरवाढ झाल्याने बाजारात राख्या महागल्याच देखील चित्र पाहायला मिळत आहे.

श्रावणातील अति महत्त्वाचा असलेला रक्षाबंधन हा सण येत्या 11 ऑगस्टला साजरा होत असल्याने इगतपुरीतील बाजारपेठा राख्यांच्या स्टॉलने सजल्या आहेत यामध्ये विविध डिझाईन आणि आकर्षक राख्या विक्रीसाठी बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत. आपल्या बंधूराजाला आपल्या प्रेमाची राखी वेळेत पोहोचावी यासाठी महिला भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये राखेची खरेदी करताना दिसत आहेत लहानग्यांना आवडणारी कार्टून राखी पासून मोत्याची राखी, डायमंड राखी, तसेच पोस्टर राखी या राखीच्या डिझाईनला सर्वात जास्त महिला वर्गाकडून मागणी आहे गेल्या दोन वर्षापासून कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राखी विक्रेत्या व्यापाऱ्यांना राखी विक्रीचा व्यवसाय करता आला नसल्याने त्यांना मोठा तोटा देखील सहन करावा लागला होता त्यामुळेच यंदाच्या राखी मध्ये 25 ते 30 टक्क्यापर्यंत मोठी दरवाढ झाल्याने बाजारात राख्या महागल्याच देखील चित्र पाहायला मिळत आहे.

Published on: Aug 08, 2022 09:41 AM