Nashik Crime : नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; कारचालकाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल
Nashik Shalimar Chowk Crime News : नाशिकमध्ये गाडीचा कट लागल्याचा आरोप करत एका रिक्षा चालकाने कार चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
भर रस्त्यात गुंडगिरी करणाऱ्या रिक्षाचालकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. रिक्षाचालकाच्या गुंडागिरीचा हा प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हारायल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. नाशिकमध्ये अनधिकृत रिक्षा चालकाकडून एका कार चालकाला मारहाण करण्यात आली होती. शालीमार चौकात हा प्रकार घडला होता. गाडीचा कट लागल्याचा आरोप करत परिवारासोबत असलेल्या कार चालकाला एका अनधिकृत रिक्षाचालकाने मारहाण केली होती. यावेळी रिक्षाचालकाने गाडीची काच देखील फोडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर नाशिक पोलिसांनी कारवाई करत या रिक्षा चालकाला अटक केली आहे.
Published on: Mar 16, 2025 06:47 PM
Latest Videos

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
