आदित्य ठाकरे यांच्या विचारांची किव करावीशी वाटतेय; शिवसेनेच्या नेत्याचं टीकास्त्र

आदित्य ठाकरे यांच्या विचारांची किव करावीशी वाटतेय; शिवसेनेच्या नेत्याचं टीकास्त्र

| Updated on: Apr 08, 2023 | 2:27 PM

Dada Bhuse on Aditya Thackeray : एक शिवसैनिक म्हणून मला वाटतं की, या सरकारने सगळे चांगले निर्णय घेतले आहेत, दादा भुसे म्हणाले आहेत. पाहा संपूर्ण व्हीडिओ...

नाशिक : शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मला आदित्य ठाकरे यांच्या विचारांची किव करावीशी वाटते. आपल्या हातात काही शिल्लक राहिलेलं नाही, या वैफल्यग्रस्त भावनेतून हे आरोप केले जात आहेत, असं दादा भुसे म्हणाले आहेत. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, मला एक तास जरी पंतप्रधान केलं, तर मी राम मंदिर बांधणार आणि कलम 370 हटवणार… त्यांचं ते स्वप्न आता पूर्ण होतंय. राम मंदिराचं काम सुरू आहे. संपूर्ण जगाला हेवा वाटेल असं हे मंदीर आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या-ज्या इच्छा होत्या, त्या-त्या पूर्ण झाल्या आहेत, असं दादा भुसे म्हणाले आहेत.

Published on: Apr 08, 2023 02:27 PM