गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; दारुड्या हुल्लडबाजांनी केला हा पराक्रम अन् आयोजकही अडचणीत
गौतमीच्या नाशिकमधल्या कार्यक्रमात तरुणांनी हुल्लडबाजी केली आहे. या तरुणांनी पत्रकारांना मारहाणही केली आहे. गौतमी पाटीलचा डान्स दिसत नसल्यामुळे तरुणांनी पत्रकारांना खुर्च्यांनी मारहाण केली, यामध्ये मीडियाच्या अनेक कॅमेरांचंही नुकसान झालं आहे.
नाशिक : नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आणि राडा, पोलिसांचा प्रसाद आणि आयोजकांवर नोंद होणारे गुन्हे हे आता काही नविन नाही. त्यातच गौतमी पाटील हिच्यावर देखिल गुन्हे दाखल होतच आहेत. आयोजकांसह गौतमीवर गुन्हे दाखल होण्याचा सिलसिला सुरूच असताना आता आणखीन एक गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा आयोजकांवर दाखल झाला असून कारण ही चांगलंच आहे. गौतमीच्या नाशिकमधल्या कार्यक्रमात तरुणांनी हुल्लडबाजी केली आहे. या तरुणांनी पत्रकारांना मारहाणही केली आहे. गौतमी पाटीलचा डान्स दिसत नसल्यामुळे तरुणांनी पत्रकारांना खुर्च्यांनी मारहाण केली, यामध्ये मीडियाच्या अनेक कॅमेरांचंही नुकसान झालं आहे. दम्यान नाशिक पोलीस गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यात दंग होते. या प्रकरणाची पोलिसांनी नंतर गंभीर दखल घेत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच गोतमीचा कार्यक्रम आयोजित करणा-यांवर नियमांचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गौतमी पाटील यांचे कार्यक्रम व गोंधळ हे समीकरण तयार झाले आहे. काही दिवसांपूर्वी निफाडमधील कार्यक्रमात खुर्च्या फेकून युवकांनी गोंधळ घातला होता. त्याची पुनरावृत्ती नाशिकमध्येही झाली.