पक्ष पवारसाहेबांनी स्थापन केला, अजितदादा आमचे नेते, पण…; राष्ट्रवादीच्या महिला आमदाराची भूमिका काय?
MLA Saroj Ahire on Ajit Pawar BJP : अजित पवार भाजपसोबत गेल्यास राष्ट्रवादीच्या 'या' महिला आमदाराची भूमिका काय?
नाशिक : देवळाली मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहिरे यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व बातम्या मीडियाच्या माध्यमातून येत आहेत. आमचा पक्ष हा माननीय पवारसाहेब यांनी स्थापन केला आहे. पवार साहेब यांच्यानंतर दोन नंबरचे स्थान अजित पवार यांना आहे. पक्षाचे प्रमुख म्हणून शरद पवार यांना मी मानते. त्यामुळे पवारसाहेब यांच्या मान्यतेनुसार माझा निर्णय असेल, असं सरोज आहिरे म्हणाल्या आहेत. मतदारसंघात मोठा निधी प्राप्त झाल्याने अजित पवार यांच्याबद्दल आदर आहे, असं म्हणत सरोज आहिरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आमदार नितीन पवार यांनी जी भूमिका व्यक्त केली, ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. आम्ही पक्षाच्या सोबत आहोत, असंही त्या म्हणाल्या आहेत.
Published on: Apr 18, 2023 12:06 PM
Latest Videos