अवकाळी पावसामुळे 'इतक्या' हजार हेक्टर शेतीचं नुकसान; राज्याच्या कृषी आयुक्तांची माहिती

अवकाळी पावसामुळे ‘इतक्या’ हजार हेक्टर शेतीचं नुकसान; राज्याच्या कृषी आयुक्तांची माहिती

| Updated on: Apr 10, 2023 | 12:40 PM

Maharashtra Unseasonal Rain : नुकसान पाहणीसाठी थेट राज्याचे कृषी आयुक्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. माहितीसाठी सविस्तर व्हीडिओ पाहा...

नाशिक : मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झालाय. हजारो हेक्टर शेतीचं यामुळे नुकसान झालंय. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे राज्यात 34 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. नाशिकमध्ये बोलताना सुनील चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. प्रत्यक्ष पंचनामे झाल्यानंतर आकडेवारी समोर येईल. लवकरच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. नुकसान पाहणीसाठी राज्याचे कृषी आयुक्त बांधावर जाणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगावमध्ये ते पाहणी करणार आहेत.

Published on: Apr 10, 2023 12:40 PM