त्र्यंबकेश्वर प्रकरणावरून ठाकरे यांच्यावर भाजप नेत्याचा निशाना; म्हणाला, ”हिरव्यांची मस्ती”, ”लेच्यापेच्याचं सरकार”
मुस्लिम पक्षाने त्यांची बाजू मांडडली आहे. तर यावर मंदिर प्रशासनाने त्याचं म्हणणं मांडलं आहे. मात्र, आता या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, एका नव्या वादाला तोंड फुटल्याचं दिसून येत आहे.
मुंबई : नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात 10 ते 12 जणांच्या जमावाने बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शनिवार पासून आजपर्यंत हे प्रकरण धुमसत आहे. त्यावरून मुस्लिम पक्षाने त्यांची बाजू मांडडली आहे. तर यावर मंदिर प्रशासनाने त्याचं म्हणणं मांडलं आहे. मात्र, आता या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, एका नव्या वादाला तोंड फुटल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणावर भाजप नेते नितेश राणे यांनी जोरदार हल्ला चढवत टीका केली होती. दरम्यान, आता भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी देखील एक व्हिडिओ शेअर करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भोसले यांनी, “हे भगवं सरकार आहे… इथे हिरव्यांची मस्ती चालणार नाही, उद्धव ठाकरेंसारख्या लेच्यापेच्या लोकांचे हे सरकार नाही..’ असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल केला आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्र्यंबकेश्वरच्या प्रकरणात गुन्हा नोंदवून SIT स्थापन केल्याबद्दल आभार मानले आहेत.