हिंमत असेल तर स्वत:चा पक्ष काढा अन् 5 आमदार निवडून आणून दाखवा; संजय राऊत यांचं एकनाथ शिंदे यांना आव्हान
Sanjay Raut on Cm Eknath Shinde : उद्धव ठाकरे उद्या मालेगावमध्ये येणार आहेत. या सभेची लोकांमध्ये उत्सुकता आहे. ती उत्सुकता फक्त मालेगावमध्ये नाहीतर संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे. या चोर मंडळाला घालवण्याची मालेगावमधून सुरूवात होईल, असं संजय राऊत म्हणालेत.
मालेगाव, नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा पक्ष काढून 5 आमदार निवडून आणून दाखवा, असं आव्हान संजय राऊत म्हणालेत. राज ठाकरे, नारायण राणे आणि इतर सर्व नेत्यांच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे असतात. त्यामुळे उद्धव ठाकरे मोठे नेते आहेत. हे सर्व नेते फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर बोलतात म्हणजे उद्धव ठाकरे यांची त्यांना भीती वाटते, असंही संजय राऊत म्हणालेत. ते नाशिकमधील मालेगावमध्ये बोलत होते.
Published on: Mar 25, 2023 11:41 AM
Latest Videos