जीवे मारण्याची सुपारी दिल्याच्या आरोपांनंतर संजय राऊत यांचा जबाब नोंदवण्यास सुरूवात

जीवे मारण्याची सुपारी दिल्याच्या आरोपांनंतर संजय राऊत यांचा जबाब नोंदवण्यास सुरूवात

| Updated on: Feb 22, 2023 | 10:04 AM

शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी काल खासदार श्रीकांत शिंदेंवर जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप केला.त्यानंतर आज ठाणे पोलिसांकडून संजय राऊत यांचा जबाब घेण्याचे काम सुरूवात झाली आहे.

नाशिक : शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी काल खासदार श्रीकांत शिंदेंवर जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप केला. त्यानंतर आज ठाणे पोलिसांकडून संजय राऊत यांचा जबाब घेण्याचे काम सुरूवात झाली आहे. राऊत आज नाशकात आहेत. त्यामुळे त्यांचा जबाब घेण्यासाठी ठाणे पोलीस नाशिकला पोहोचलेत. ठाणे पोलिसांच्या 6 जणांचं पथक नाशिकच्या एक्स्प्रेस इन हॉटेलमध्ये दाखल झालंय. इथं राऊतांचा जबाब नोंदवला जातोय. आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा राऊतांनी काल आरोप केला होता. राऊतांच्या आरोपानंतर ठाणे पोलिसांकडून राऊत यांचा जवाब घेण्याचं काम सुरू आहे.

Published on: Feb 22, 2023 10:04 AM