नाशिकमध्ये सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली
नाशिकरोड (Nashik) परिसरातल्या संगमेशवर नगर मध्ये सराईत गुन्हेगारांची (Crime) धिंड काढत पोलिसांनी त्यांना चांगलाच खाक्या दाखवला आहे.
नाशिकरोड (Nashik) परिसरातल्या संगमेशवर नगर मध्ये सराईत गुन्हेगारांची (Crime) धिंड काढत पोलिसांनी त्यांना चांगलाच खाक्या दाखवला आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न या गुंडांकडून केला जात होता. दोन दिवसांपूर्वीच हातात तलवारी नाचवत या तडीपार गुंडांनी काही घरांवर दगडफेक केली, तर काही गाड्यांची देखील तोडफोड केली होती.अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या या तडीपार गुंडांच्या मुसक्या आवळत, पोलिसांनी ज्या परिसरात ते दहशत माजवत होते तिथूनच त्यांची धिंड काढत त्यांना काठ्यांचा प्रसाद दिला आहे.पोलिसांच्या या कारवाईमुळे या गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत
Published on: Feb 07, 2022 01:16 PM
Latest Videos