Video | रात्री रेल्वे रुळावरून घसरली, कुठे घडली घटना?
नाशिक आणि दौंड मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. दुरुस्ती झाल्यानंतर मालगाडी पुढील प्रवासासाठी निघाली. त्यानंतर आज बुधवारी सकाळपासून रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे.
शैलेश पुरोहित, नाशिकः मध्य रेल्वे मार्गावर (Central Railway) मंगळवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. इगतपुरीजवळ (Igatpuri) एक मालगाडी रेल्वे रुळावरून घसरली. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. यामुळे वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला होता. कसाऱ्यावरून नाशिकच्या (Nashik) दिशेने येत असताना या मालगाडीचं चाक रुळावरून घसरलं. यामुळे एक बोगी घसरली. यात गार्डला दुखापत झाली नाही. मध्य रेल्वेची अपघात टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. युद्धपातळीवर प्रयत्न करून ही बोगी दुरुस्त करण्यात आली. यामुळे नाशिक आणि दौंड मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. दुरुस्ती झाल्यानंतर मालगाडी पुढील प्रवासासाठी निघाली. त्यानंतर आज बुधवारी सकाळपासून रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट

वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच

जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले

धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
