नाशिक शहरात आज पाणीबाणी

नाशिक शहरात आज पाणीबाणी

| Updated on: May 21, 2022 | 8:54 AM

आज नाशिकचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. काही तांत्रिक कामांमुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर उद्या देखील नाशिककरांना कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. काही तांत्रिक कामांसाठी आज नाशिकचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. आज संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहील तर उद्या शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.