कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा उमेदवार ? कोणी केली  टिका

कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा उमेदवार ? कोणी केली टिका

| Updated on: Jul 06, 2024 | 2:28 PM

कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा दावेदार पुढे येतील. त्यांना 288 जागा लढविण्याशिवाय पर्याय नाही अशी टिका राष्ट्रवादीच्या नेत्याने केली आहे. राजकारणात कोणालाही निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. जर जरांगे पाटील यांना निवडणूक लढवायची असेल तर ते लढवू शकतात.

नंदूरबार : विधान सभेच्या निवडणूका दिवाळीच्या आधी होणार आहेत. त्यामुळे आता सर्वच पक्षांमध्ये स्वतंत्रपणे लढण्याची ताकद आजमावून पाहीली जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आमदार अनिल पाटील यांनी कॉंग्रेसवर टिका केली आहे. कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांना 288 जागा लढविण्याशिवाय तरणो पाय नाही असेही अनिल पाटील यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या गटाबद्दल संशय आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडी म्हणून आता एकत्र राहणार नाहीत असेही आमदार अनिल पाटील यांनी म्हटले आहे.  शिवसेनेचा एक मुखवटा पुढे करून कॉंग्रेस काम करीत असली तरी कॉंग्रेसमध्ये आजवरची परंपरा अशी आहे की सर्व जागा लढवून पक्षासाठी निधी गोळा केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. मराठा समाजाच्या बाजूने मुख्यमंत्री आहेत. जरांगे पाटील काही वेगळा निर्णय घेतील असे वाटत नाही. जर त्यांना निवडणूकीला उभे राहायचे आहेत तर तो त्यांचा प्रश्न आहे असेही अनिल पाटील यांनी म्हटले आहे.

 

Published on: Jul 06, 2024 01:46 PM