राऊत यांच्या दाव्यावरून शिंदे गटाच्या नेत्याचं वक्तव्य; म्हणाला… ‘अजित पवार यांनी पाठिंबा दिलाय’
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील यावरून आपली प्रतिक्रिया देताना, शिंदे-फडणवीस सरकार पडणार असल्यानेच नवा मुख्यमंत्री शोधला जात आहे. तर अजित पवार हे या राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील त्यासाठीच हे बंडखोरीचं राजकारण झाल्याचं म्हटलं होते.
सांगोला : राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर अनेकांनी त्यावर आपले तर्क लावले. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील यावरून आपली प्रतिक्रिया देताना, शिंदे-फडणवीस सरकार पडणार असल्यानेच नवा मुख्यमंत्री शोधला जात आहे. तर अजित पवार हे या राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील त्यासाठीच हे बंडखोरीचं राजकारण झाल्याचं म्हटलं होते. त्यावरूनही आता राजकीय चर्चा होताना दिसत आहेत. याचमुद्द्यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते सांगोल्याचे आमदार शाहजीबापू पाटील यांनी राऊत यांचा मुद्दा खोडून काढला आहे. यावेळी शाहजीबापू पाटील यांनी, येणाऱ्या 2024 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील असे म्हटलं आहे. तर कोण मुख्यमंत्री? कोण उपमुख्यमंत्री? यापेक्षा सुरू असलेला गतिमान विकासला महाराष्ट्रात अधिक गितमान करण्यासाठीच अजित पवार यांनी पाठिंबा सरकारला दिला आहे.