'कॉलेजमध्ये बऱ्याच जणींना घेऊन फिरलोय..., ' असं काय म्हणाले अजित पवार

‘कॉलेजमध्ये बऱ्याच जणींना घेऊन फिरलोय…, ‘ असं काय म्हणाले अजित पवार

| Updated on: Aug 10, 2024 | 1:33 PM

अजितदादा पवार यांनी महायुतीत आपले स्वतंत्र अस्तित्व राखण्यासाठी जनसन्मान यात्रा सुरु केली आहे. ही यात्रा शनिवारी सिन्नर येथे पोहचली तेव्हा ते मोटार सायकलवर हेल्मेट घालून मागे बसलेले दिसले. त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राज्यातील अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आपआपल्या प्रचारयात्रा सुरु केल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेचा तिसरा दिवस असून सिन्नर येथे अजितदादा यांनी मोटर सायकलीच्या मागे बसून प्रवास केला. यावेळी त्यांनी आपण कॉलेजच्या दिवसात मोटर सायकल चालविली आहे. परंतू आता सार्वजनिक जीवनात सुरक्षेमुळे इतर कारणांनी मोटर सायकल चालवायला मिळत नाही. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की मी कॉलेजच्या जीवनात मोटरसायकल खुप चालविली आहे. यावेळी ते म्हणाले की कॉलेजच्या जीवनात अनेक जणींना मोटरसायकलवरुन फिरविले आहे. अजित पवार हे सध्या राजकारणात गुलाबी रंगाचा ट्रेड आणून महिला मतदारांना आकृष्ट करीत आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात त्यांनी राज्यातील महिलांना 1500 रुपयांचे अनुदान देणारी मुख्यमंत्री बहिण माझी लाडकी ही योजना सुरु केली आहे. तिला खूपच प्रसिद्धी मिळाली आहे.मध्य प्रदेशात या लाडली बहेना योजनेने भाजपाला प्रचंड मते मिळाली आणि सत्ता कायम राखली होती. त्यामुळे महायुती सरकारने देखील या योजनेची ‘रि’ ओढली आहे.

Published on: Aug 10, 2024 01:33 PM