‘उघड्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय काहीच राहणार नाही’; एकनाथ खडसे असे का म्हणाले?

‘उघड्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय काहीच राहणार नाही’; एकनाथ खडसे असे का म्हणाले?

| Updated on: Jul 24, 2023 | 8:16 AM

तर जे २२ जण जखमी आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यादरम्यान आता सुरू असणारे बचावकार्य थांबवण्यात आल्याचं माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केली आहे.

मुक्ताईनगर/जळगाव, 24 जुलै 2023 | रायगडमधील इर्शाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत 27 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर अंदाजे 78 जण अजूनही बेपत्ता आहेत. तर जे वाचले आहेत त्यांचे पुनर्वसन केले जात आहे. तर जे २२ जण जखमी आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यादरम्यान आता सुरू असणारे बचावकार्य थांबवण्यात आल्याचं माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केली आहे. याचदरम्यान इर्शाळवाडी सारख्या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी, इर्शाळवाडी सारख्या घटना महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत. पूर्वी माळीन सारखी घटना घडली, अशा स्वरूपाच्या घटना घडविण्यात म्हणून सरकारने संशोधन समिती नेमून त्या संदर्भात रिसर्च करण्याची आवश्यकता आहे. यामधून कायमची उपाययोजना झाली पाहिजे, प्रोटेक्शन वाल बांधन, त्या लोकांचं पुनर्वसन करायला हवं. तर सरकारने हा विषय प्राधान्याने घेतला पाहिजे अन्यथा अनेक शेकडो लोकांचे जीव त्या ठिकाणी जातील आणि आपल्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय काहीच राहणार नाही असेही खडसे यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 24, 2023 08:16 AM