दुसऱ्याचा संसार मोडून स्वताचं घर वसवणे, हे दीर्घकाळ टीकत नाही; भाजपवर वडेट्टीवार यांची खोचक टीका
अजित पवार यांच्यावर काय चौकशी सुरु आहे माहित आहे. संजय राऊत मोठे पत्रकार आहेत, ते नेते आहेत. त्याची माहिती त्यांच्याकडे आली असेल म्हणून त्यांनी तस लिहलं असाव असे ते म्हणाले
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच त्यांचा आता दुसऱ्यांना दौरा रद्द झाला आहे. आता त्यांचा पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी मेळाव्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. अजित पवारांनी पुरंदर दौरा अचानक रद्द केला. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. त्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला टोला लगावला आहे.
यावेळी त्यांनी, अजित पवार यांच्यावर काय चौकशी सुरु आहे माहित आहे. संजय राऊत मोठे पत्रकार आहेत, ते नेते आहेत. त्याची माहिती त्यांच्याकडे आली असेल म्हणून त्यांनी तस लिहलं असाव असे ते म्हणाले. तर तपास यांत्रणांचा गैरवापर करुन विदोधकांना वळवण्याचं काम सुरू असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तर यावेळी, दुसऱ्याचा संसार मोडून स्वताचं घर वसवणे, हे दीर्घकाळ टीकत नाही. धाकधपट करुन जबरदस्तीने केलेला विवाह टीकत नाही. तर प्रेमाचा विवाह टिकतो. राजकारणातंही प्रेमाने व्हावं असं म्हटलं आहे. तर ते भाजपमध्ये प्रवेश करतील ही चर्चा तर पसरलीय. पण विश्वास आहे की अजीत दादा असं पाऊल टाकणार नाहीत.