बुलढाणा खासगी बस अपघात, जितेंद्र आव्हाड म्हणतात, ‘अशा घटनांना चाप लावण्यासाठी...’

बुलढाणा खासगी बस अपघात, जितेंद्र आव्हाड म्हणतात, ‘अशा घटनांना चाप लावण्यासाठी…’

| Updated on: Jul 01, 2023 | 12:23 PM

हा अपघात सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा गावाजवळ झाला. ज्यात खासगी बस दुभाजकाला धडकून पलटी झाली आणि ती आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. यात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर अपघातातून ८ प्रवासी बालबाल बचावले. यानंतर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

मुंबई : नागपूरहून पुण्याला निघालेल्या खासगी बसचा बुलढाण्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर मोठा अपघात झाला. हा अपघात सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा गावाजवळ झाला. ज्यात खासगी बस दुभाजकाला धडकून पलटी झाली आणि ती आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. यात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर अपघातातून ८ प्रवासी बालबाल बचावले. यानंतर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. तर या अपघातावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाना साधत टीका करणे ही सुरू केलं आहे. याच अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत मृत्यू झालेल्या प्रवाशांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर खाजगी बसच्या संदर्भात सरकारकडे माघणी केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये, बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे एका खाजगी बसला अपघात होऊन 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आहे. भावपूर्ण श्रद्धांजली…! अश्या दुर्दैवी घटना पुन्हा होऊ नयेत, यादृष्टीने राज्य सरकारने, खाजगी बसच्या संदर्भात कडक संहिता जाहीर करावी, जेणेकरून अश्या घटनांना चाप बसेल असे म्हटलं आहे.

Published on: Jul 01, 2023 12:23 PM